लाचखोर पोलीस निरीक्षकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
लोणावळा – गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे (वय ५२ वर्षे) यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक कुतुबुद्दीन खान आणि यासीन शेख यांनाही कह्यात घेतले आहे. तक्रारदारांची गॅस एजन्सी असून कारवाई न करण्यासाठी खान यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितली होती. मोरे यांनी खानला लाच घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे तक्रारदारांनी एसीबीकडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) तक्रार नोंदवल्याने सापळा रचून खान आणि शेख यांना अटक केली. या वेळी मोरे पोलीस ठाण्यातून पळून गेले. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यावर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने तो फेटाळला.
१५ सहस्र रुपये लाच घेतांना सार्वजनिक बांधकाम खात्यातील कारकून अटकेत !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील सार्वजनिक बांधकाम खात्यात १५ सहस्र रुपये लाच घेतांना चंद्रकांत टोनपे या कारकुनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर येथील कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. यावर पंढरपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. (लाचखोरी मुळापासून नष्ट होण्यासाठी लाचखोरांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक)
यातील तक्रारदार यांनी त्यांची भूमी ही वाणिज्य व्यवसाय प्रयोजनासाठी बिगर शेती (एन्.ए.) करण्यासाठी अर्ज सादर केला होता. तक्रारदाराला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडे ३० सहस्र रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ सहस्र रुपये स्वीकारण्याचे मान्य करून लाच घेतांना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था ! हे पालटण्यासाठी धर्माचरणी प्रजा निर्माण होणे आवश्यक ! |