हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोव्यात होत असलेल्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर १० जूनला पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेचे सूक्ष्म परीक्षण !
१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत गोव्यामध्ये श्री रामनाथ देवस्थानाच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘दशम अखिल भारतीय हिंदु अधिवेशन’ होत आहे. या पार्श्वभूमीवर १० जूनला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पणजी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेचे ‘यू ट्यूब’वर झालेले थेट प्रक्षेपण पहात असतांना देवाने माझ्याकडून करून घेतलेल्या सूक्ष्म परीक्षणातील महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.
१. प्रा. सुभाष वेलिंगकर ‘भारतमाता की जय’ या संघटनेचे गोवा राज्य संघचालक
श्री. वेलिंगकर यांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीची शक्ती कार्यरत होऊन तिने गोव्यातील चर्चसंस्थेने अधिग्रहण केलेल्या शंखवाळ येथील श्री विजयादुर्गादेवीची भूमी आणि गोव्यातील हिंदूंचे ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतर या विषयांवर प्रकाश टाकला. तेव्हा त्यांच्या वाणीतून श्री दुर्गादेवीची मारक शक्ती कार्यरत होऊन तिने गोव्यातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडली.
२. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदु राष्ट्र स्थापण्याचे महत्त्व विशद करणे
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या माध्यमातून आद्य शंकराचार्यांचे रूप कार्यरत होऊन त्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानशक्ती कार्यरत झाली आणि त्यांच्या वाणीतून ब्राह्मतेज वायूमंडलात प्रक्षेपित झाले. त्यामुळे पत्रकारांना हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे महत्त्व बौद्धिक स्तरावर समजले.
३. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे
श्री. शिंदे यांनी हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व सांगितले. तेव्हा त्यांच्या माध्यमातून श्री हनुमंताची धर्मशक्ती कार्यरत झाल्याचे जाणवले. या धर्मशक्तीचा रंग केशरी असून त्यातून असंख्य सोनेरी रंगाच्या गदा वायुमंडलात प्रक्षेपित होऊन वातावरणातील त्रासदायक अधर्मी शक्तींशी सूक्ष्मातून युद्ध झाले. त्याचप्रमाणे अधिवेशनाच्या ठिकाणी म्हणजे श्री रामनाथ देवस्थानाच्या सभागृहामध्ये श्री हनुमानाची धर्मशक्ती कार्यरत होऊन या स्थानी धर्मशक्तीचे स्थान सूक्ष्मातून निर्माण होण्याची प्रक्रिया आरंभ झाली.
४. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस
श्री. राजहंस यांच्या माध्यमातून श्रीगणेशाच्या ‘ब्राह्मणस्पति’ या रूपाचे तत्त्व श्री. राजहंस यांची बुद्धी आणि वाणी यांच्या माध्यमातून कार्यरत झाले. त्यामुळे त्यांच्या वाणीतून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज वातावरणात प्रक्षेपित होऊन धर्माला विरोध करणाऱ्या अधर्मी वाईट शक्तींवर श्री गणेशाच्या अंकुशाचा प्रहार झाला अन् वायूमंडलात धर्मशक्ती ज्ञानतेजाच्या रूपाने कार्यरत झाली. तेव्हा पत्रकार परिषदेच्या ठिकाणी ज्ञानतेजाचा सोनेरी प्रकाश पसरून सर्वत्र हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूरक असणाऱ्या विचारांचा प्रसार होत असल्याचे जाणवले.
५. पत्रकार परिषदेच्या मान्यवरांची सूक्ष्मातून जाणवलेली विविध वैशिष्ट्ये
५ अ. पत्रकार परिषदेतील मान्यवरांची गुणवैशिष्ट्ये
६. पत्रकार परिषदेत मान्यवरांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यामुळे गोमंतकात हिंदु अधिवेशनासाठी आवश्यक असणारे पूरक वातावरण सूक्ष्म स्तरावर निर्माण होण्याची प्रक्रिया आरंभ होणे
पत्रकार परिषदेच्या आरंभी काळ्या रंगाचा पडदा दिसत होता आणि तेथे सूक्ष्मातून दाब जाणवत होता. जेव्हा पत्रकार परिषद आरंभ झाली, तेव्हा धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व कार्यरत होऊन पत्रकार भवनात श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र फिरू लागले. या चक्रातून ज्ञान आणि चैतन्य यांचे तेजोमय किरण प्रक्षेपित झाल्यामुळे तेथील वातावरणातील दाब न्यून होऊन वातावरण चैतन्यदायी झाले. पत्रकार परिषदेतील वक्त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वातावरणात धर्मशक्ती कार्यरत झाली. मान्यवरांनी पत्रकारांच्या प्रश्नांची अत्यंत समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे पत्रकारांच्या मनातील हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील शंकांचे निरसन झाले. अशा प्रकारे ही पत्रकार परिषद झाल्यामुळे धर्मशक्तीसह ज्ञानशक्तीचे चैतन्यही गोमंतकात प्रवाहित झाले. त्यामुळे गोमंतकात सुप्तावस्थेत असणारी श्री परशुरामाची धर्मशक्ती आणि ज्ञानशक्ती जागृत होऊन कार्यरत झाली. त्यामुळे गोमंतकात हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी आवश्यक असणारे पूरक वातावरण सूक्ष्म स्तरावर निर्माण होण्याची प्रक्रिया आरंभ झाली.
कृतज्ञता
श्रीगुरूंच्या कृपेमुळे पत्रकार परिषदेचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा करता आली आणि हिंदु राष्ट्राचे महत्त्व लक्षात आले. यासाठी मी श्रीगुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात. वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. |