‘राहुल जैन’ उपाख्य वसीम खानचा उद्योगपती हिंदु महिलेशी लव्ह जिहाद !
अनेक वेळा केला बलात्कार !
जयपूर – ऑनलाइन कपड्यांचा व्यवसाय करणार्या एका ३४ वर्षीय हिंदु महिलेला वसीम खान याने ‘राहुल जैन’ असे खोटे नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २ वर्षे तिच्यासमवेत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. सदर महिला तिच्या आधीच्या पतीशी घटस्फोट घेऊन तिच्या दोन मुलांसह रहात होती. तिने घटस्फोट घेतल्याचे फेसबूकद्वारे समजताच वसीम खानने तिच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवत फेसबूकद्वारे तिच्याशी मैत्री केली.
Jaipur, RJ: Waseem Khan from Meerut becomes Rahul Jain, traps a divorced #Hindu business women, is in a live-in relationship promising marriage. When he takes her to his village, his brother Naseem tries to rape her. Investigations on#LoveJihad#RapeJihadhttps://t.co/2SklAckmLe
— Stop Hindu Hate Advocacy Network (SHHAN) (@HinduHate) June 14, 2022
हिंदु महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मे २०२० मध्ये वसीम खान तिला भेटण्यासाठी जयपूरला आला होता. तिच्याशी विवाह करण्याचे वचन देऊन तिच्यावर बलात्कार केला. तिला तिच्या व्यवसायात साहाय्य करून तिच्यासह तो राहू लागला. गेल्या आठवड्यात वसीम तिला त्याच्या मेरठ येथील गावी घेऊन गेला. तेथे असतांना वसीमच्या भावानेही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला तो मुसलमान असल्याचे समजले. ती पळून जयपूरला आली. आता वसीम तिच्या दोन मुलांची हत्या करण्याची धमकी देत तिला परत बोलावत आहे.