दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे !
१. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी भाव !
१४ जून या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी त्यांच्या भाषणाला प्रारंभ करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेने आपण एकत्र आलो आहोत. जगाचा इतिहास आणि भूगोल पालटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना प्रणाम’, असा भावपूर्ण प्रमाण केला.
२. मध्यप्रदेश येथील ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या अध्यक्षा मीनाक्षी शरण यांनी श्री केदारनाथ आणि श्री बद्रीनाथ या देवतांच्या चरणांवर अर्पण केलेली चैतन्यमय पुष्पे प्रसादरूपाने अधिवेशनाच्या आयोजकांकडे सुपुर्द केली.
३. अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित उद्योजक तथा ‘सेंटोलॉजी’ यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. आदित्य सत्संगी हे ८ दिवसांसाठी भारतात आले आहेत. ते जिज्ञासेपोटी वेळात वेळ काढून अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित राहिले.
वैशिष्ट्यपूर्ण !
विविध क्षेत्रांतील असूनही हिंदुत्वनिष्ठांमध्ये दिसून आला धर्मबंधुत्वाचा भाव !
या अधिवेशनाला भारतातील विविध राज्यांतील, तसेच अन्य देशांतूनही हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. विविध हिंदुत्वनिष्ठांची भाषा वेगवेगळी असल्याने भाषेची अडचण असूनही ‘सर्व हिंदुत्वनिष्ठ हिंदुत्वाच्या विचाराने जोडले आहेत’, असे अनेक प्रसंगांत जाणवले. त्यामुळे प्रांत आणि भाषा वेगळी असली, तरी सर्व हिंदुत्वनिष्ठांमध्ये धर्मबंधुत्वाचा भाव दिसून आला. काही वक्त्यांना हिंदी भाषेतून बोलण्याचा सराव नसल्याने भाषण करतांना अडचण आली. असे असूनही त्यांचा धर्मकार्यातील सहभाग आणि धर्मकार्यातील प्रत्यक्ष योगदान यांमुळे त्यांचा विषय ऐकतांना उपस्थितांना उत्साह वाटत होता.
पत्रकारांचे हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी योगदान !
१. काशी विश्वनाथ मंदिर अतिक्रमणमुक्त होण्यासाठी ज्ञानवापीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा वेळ घेऊन पत्रकारांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली.
२. अधिवेशनाचे पहिले २ दिवस ‘गोवा रिपोर्ट कार्ड’ हे फेसबूक न्यूज पोर्टल, ‘आर्डीएक्स गोवा वृत्तवाहिनी’ आणि ‘गोवा ९ वाहिनी’ यांनी काही कालावधीसाठी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण केले.