अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्यासाठी आलेले ३ आतंकवादी ठार
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील बेमिना भागात सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले. येत्या ३० जूनपासून चालू होणार्या अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्याचा या आतंकवाद्यांचा कट होता.
Three terrorists sent by Pak-based handlers to target #AmarnathYatra killed by security forces in J&Khttps://t.co/FsT1G9Seh4
— TIMES NOW (@TimesNow) June 14, 2022
ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता. त्याचे नाव आदिल हुसैन मीर असून तो पहलगाम येथील रहिवासी होता, तर पाकिस्तानमधून आलेल्या २ आतंकवाद्यांपैकी एकाचे नाव अब्दुल्ला गौजरी असे होते.