नागेशी येथील श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीच्या वतीने ज्ञानवापीसाठी लढणार्या अधिवक्त्यांचा सत्कार
रामनाथी, १३ जून (वार्ता.) – काशी विश्वनाथ मंदिर अतिक्रमणमुक्त होण्यासाठी ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देत असलेले सर्वोच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते तथा सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १३ जून या दिवशी नागेशी येथील श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीने विशेष गौरव केला.
या वेळी श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. दामोदर भाटकर, सचिव श्री. प्रशांत केरकर, खजिनदार श्री. संजीव सरदेसाई आणि उपाध्यक्ष संजय प्रियोळकर यांची उपस्थिती होती.