सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस हा विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न ! – संजय राऊत, खासदार
मुंबई – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पाठवलेली नोटीस अवैध असून हा विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काँग्रेसकडून होणारे आंदोलन हा केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून होत असलेल्या दुरुपयोगाच्या विरोधातील संताप असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय पडताळणी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा छळ चालू आहे. हे देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही यांना खड्ड्यात घालण्याचे काम करत असल्याचेही राऊत यांनी सांगितले.