खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत केवळ १५.९८ टक्के पाणीसाठा शिल्लक !
खडकवासला (पुणे) – खडकवासला धरणातून सध्या दौंड आणि इंदापूर या तालुक्यांना १७ जूनपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर चारही धरणांतील उर्वरित पाणीसाठा पुणे शहर परिसराला पिण्यासाठी आरक्षित आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत केवळ ४.६६ टी.एम्.सी. म्हणजे १५.९८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो १५ जुलैपर्यंत पुरेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ८.१७ टक्के पाणीसाठा अल्प आहे.