असे असेल आमुचे भव्य ‘हिंदु राष्ट्र’ ।
जनहितकारी असेल राजा ।
परोपकारी असेल प्रजा ।
धर्माचरणी असेल जनता ।
सुखसमृद्धी दिसेल सर्वथा ।। १ ।।
गुण्यागोविंदाने एकत्र रहाती ।
प्रत्येकाची देशावर प्रीती ।
निसर्गाचा असेल वरदहस्त ।
धन-धान्य पिकेल अगणित ।। २ ।।
आनंदाने बागडती पशू-पक्षी ।
प्रत्येक गोष्टीला ठेवतील ईश्वर साक्षी ।
साधू-संतांच्या आज्ञेत असेल राजा ।
सुखी आणि आनंदी दिसेल जनता ।। ३ ।।
ईश्वरप्राप्ती हेच सर्वांचे असेल ध्येय ।
त्यासाठी प्रत्येक हिंदू असेल कृतीशील ।
अभंगवाणीच्या सुस्वरे होईल रम्य पहाट ।
असे आमुचे असेल भव्य ‘हिंदु राष्ट्र’ ।। ४ ।।
– श्री. अनिल कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.३.२०२२)