रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले विचार
१. ‘रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यानंतर मला सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अंतरंगातून जाणून घेणे शक्य झाले.’
– श्री. जयप्रकाश वेंकटरमण, वेल्लोरे, तमिळनाडू.
२. ‘रामनाथी आश्रम पाहून मला साधक-जीवनाविषयी प्रेरणा मिळाली.’
– श्री. बिनिल सोमसुंदरम्, प्रांतीय सहसंयोजक, हिंदू हेल्पलाईन, एर्नाकुलम्, केरळ.
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
३. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन हे सत्याचे दर्शन घडवणारे आहे. आम्हाला ते पहाण्याचे भाग्य लाभले. प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तू अतिशय अर्थपूर्ण आहेत.’
– श्री. अभिषेक जोशी, अध्यक्ष, ओडिशा सुराख्य सेना, कटक, ओडिशा.
४. ‘प्रदर्शनातील वस्तूंवरील दैवी कण पाहून माझ्या मनातील सकारात्मकता वाढली.’
– श्री. जयेंद्रसिंह झाला, वडोदरा, गुजरात.
५. ‘हे प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट असून यातून सनातन संस्थेच्या कार्याविषयीची माहिती मिळाली.’
– श्री. जयप्रकाश वेंकटरमण, वेल्लोर, तमिळनाडू.
६. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन अविश्वसनीय आहे; परंतु ते सत्यही आहे. हा विरोधाभास आहे.’
– श्री. एस्. भास्करन्, अध्यक्ष, किल करप्शन सेव्ह इंडिया फोरम, बेंगळुरू, कर्नाटक.
७. ‘सकारात्मक शक्ती आणि नकारात्मक शक्ती यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो; मात्र सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून त्या परिणामांतील भेद लक्षात आले.’
– श्री. बिनिल सोमसुंदरम्, प्रांतीय सहसंयोजक, हिंदू हेल्पलाईन, एर्नाकुलम्, केरळ. (३१.५.२०१९)
८. ‘हिंदु राष्ट्र येथून (रामनाथी आश्रमातून) होणार आहे आणि हे हिंदु राष्ट्राचे मंदिर आहे.’ – श्री. नितीन केशव काकडे, शहरप्रमुख, लोक कल्याण ग्राहक संरक्षण संघटना, कोल्हापूर.
९. ‘रामनाथी आश्रमात मला सकारात्मक ऊर्जेचा स्रोत जाणवला.’ – अधिवक्त्या (सौ.) सीमा साळुंके, पुणे
१०. ‘आश्रमात पुष्कळ स्वच्छता आहे. साधकांना ‘हे आपले काम आहे’, असे वाटून ते हे सर्व प्रामाणिकपणे करत आहेत. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्र येथूनच चालू होणार आहे’, असे मला वाटते.’
– श्री. दीपक आ. यादव, शिवसेना ग्राहक संरक्षक कक्ष, जिल्हा प्रमुख, कोल्हापूर. (११.६.२०२२)
|