बाल आणि किशोरवयीन कामगारांना कामास ठेवू नये ! – साहाय्यक कामगार आयुक्त, सातारा
सातारा, १३ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील दुकाने, आस्थापने, हॉटेल, कारखाने, चित्रपटगृहे, गॅरेज आणि इतर ठिकाणी बाल अन् किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये. असे केल्यास हा कायद्याने गुन्हा ठरेल, अशी माहिती साहाय्यक कामगार आयुक्त रे.मु. भोसले यांनी दिली.
आयुक्त भोसले पुढे म्हणाले, ‘‘१४ ते १८ वर्षे वयोगटातील बालकास धोकादायक नसलेल्या व्यवसाय आणि प्रक्रियेमध्ये अनुमती देण्यात आली आहे; मात्र बाल आणि किशोरवयीन कामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियमन १९८६ अन्वये १४ वर्षांखालील बालकास धोकादायक आणि विनाधोकादायक व्यवसाय प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे करतांना कुणी आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’