ब्रिटनमध्ये प्रेषित महंमद यांच्या मुलीवरील चित्रपटाला विरोध करणार्‍या इमामाची सल्लागार पदावरून हकालपट्टी

लंडन – प्रेषित महंमद यांच्या मुलीवरील चित्रपटाला विरोध करणार्‍या इमामाची ब्रिटनने सल्लागार पदावरून हकालपट्टी केली. या चित्रपटावर ईशनिंदेचा आरोप करत ब्रिटनमध्ये सहस्रावधी मुसलमान रस्त्यावर उतरले आहेत. लिड्समधील मक्का मशिदीचे प्रमुख इमाम कारी महंमद असीम यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्याला विरोध दर्शवला होता.

लिड्समधील मक्का मशिदीचे प्रमुख इमाम कारी महंमद असीम यांचा चित्रपटाला विरोध

‘द लेडी ऑफ हेवन’ या चित्रपटावरून हा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटामध्ये प्रेषित महंमद यांची मुलगी फातिमा हिची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावणारा असल्याचे इमामने म्हटले होते. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता मलिक शिबाक यांना जीवे मारण्याच्या धमक्या सामाजिक माध्यमांद्वारे मिळत आहेत. यावर शिबाक यांनी ‘मला काफीर म्हटले जात आहे; मात्र याला घाबरण्यातला मी नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमान कितीही उच्चशिक्षित किंवा उच्चपदस्थ असले, तरी त्यांच्यासाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यातून दिसून येते !