देशातील ७० संकेतस्थळांवर मुसलमान ‘हॅकर्स’च्या गटाकडून ‘सायबर’ आक्रमणे

महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाचे प्रकरण

(टीप : हॅकर्स म्हणजे ‘इंटरनेट’च्या माध्यमातून संगणकातील माहिती चोरणारे किंवा तिची हानी करणारे आणि अशा कृत्याला ‘सायबर आक्रमण’ म्हणतात)

नवी देहली – महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी देशातील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी संकेतस्थळांवर सायबर आक्रमणे होत असल्याचे दिसून येत आहे. ‘हॅक’ करण्यात आलेल्या अनेक संकेतस्थळांवर वादग्रस्त संदेश दिसत आहेत. त्यात ‘आम्ही शांत बसणार नाही’, अशी धमकी देण्यात आली आहे. ‘ड्रॅगन फोर्स मलेशिया’नावाच्या ‘हॅकर्स ग्रुप’ने ही आक्रमणे केली आहेत. या हॅकर्सने जगभरातील मुसलमान हॅकर्सना भारतीय संकेतस्थळांवर आक्रमण करण्याची चिथावणी दिली आहे.

१. इस्रायलमधील भारतीय दूतावासाचे संकेतस्थळ, राष्ट्रीय शेती व्यवस्थापनाचे संकेतस्थळ आणि कृषी संशोधन केंद्राच्या संकेतस्थळ, यांवर आक्रमणे झाली आहेत. देशातील ७० संकेतस्थळांवरही ही आक्रमणे करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील ५० संकेतस्थळांचा समावेश आहे.

२. यांपैकी अनेक संकेतस्थळांवर या हॅकर्सने ध्वनीसंदेश पाठवला आहे. त्यात ‘तुम्हाला ज्याप्रमाणे तुमचा धर्म आहे, तसाच आम्हाला आमचा धर्म आहे’, असे वाक्य ऐकू येत आहे.

३. ‘वर्ल्ड वाईड वेब’वरील ‘डिजिटल’ यंत्रणेवर, तसेच इंटरनेटच्या संदर्भातील हालचालींवर लक्ष ठेवणार्‍या ‘वे बॅक’ यंत्राने ८ ते १२ जून या कालावधीत भारतातील शासकीय संकेतस्थळे, तसेच खासगी ‘पोर्टल्स’ विस्कळीत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘भारतातील अनेक बँकांची संकेतस्थळे ‘हॅक’ करण्याचा प्रयत्न केला होता’, असे सुरक्षा तज्ञांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

मुसलमान त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्याचा कांगावा करत कशा प्रकारे पेटून उठतात, हे लक्षात घ्या ! दुसरीकडे स्वतःच्या श्रद्धास्थानांचा घोर अवमान झाल्यावरही हिंदू निष्क्रीय रहातात !