बंगालच्या इस्कॉन मंदिरात उष्णतेमुळे तिघांचा मृत्यू
कोलकाता – बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पानीहाटीच्या इस्कॉन मंदिरात आयोजित दंड महोत्सवात उष्णता आणि आर्द्रता यांमुळे १२ जून या दिवशी ३ भाविकांचा मृत्यू झाला. कोरोना महामारीमुळे २ वर्षांनंतर झालेल्या या उत्सवासाठी उसळलेल्या गर्दीमुळे उष्णता आणि आर्द्रता वाढली होती. यामुळे ५० हून अधिक जण आजारीही पडले आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सदर महोत्सव रहित करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले.
Two women and a man, all aged over 60, died allegedly due to heat and exhaustion on Sunday afternoon when the crowds swelled at a fair held on the occasion of Danda Mahotsav in the Panihati area.https://t.co/plzEtEnp6N
— Hindustan Times (@htTweets) June 12, 2022
या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘पानीहाटीच्या घटनेमुळे मला दुःख झाले. उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. साहाय्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत’, असे ट्वीट केले.
Distressed to know of 3 old devotees’ death due to heat and humidity in Danda Mahotsav at ISKCON temple at Panihati. CP and DM have rushed, all help being provided. My condolences to the bereaved families, solidarity to devotees.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 12, 2022