पुणे जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण अत्यल्प !
पुणे – जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी २१० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील मुलींच्या जन्माचे प्रमाण दर हजारी मुलांच्या प्रमाणात साडेचारशेच्या आत आले आहे. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायती मुलींच्या जन्माच्या प्रमाणाविषयी ‘रेडझोन’मध्ये गेल्या आहेत. खेड आणि जुन्नर या २ तालुक्यांमधील सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी २६ ग्रामपंचायती मुलींच्या जन्माच्या प्रमाणाविषयी ‘रेडझोन’मध्ये आहेत. गावांमधील मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. या कार्यक्षेत्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवणे, बाल अत्याचार रोखणे आणि बालविवाहाला प्रतिबंध घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
संपादकीय भूमिकामुलींच्या जन्माचे प्रमाण घटत गेल्यास लोकसंख्येतील असमतोलाचे दुष्परिणाम दिसू लागतील. सरकारने यावर लवकरात लवकर उपाय काढावा ! |