नाशिक येथे तत्कालीन प्रशासनाधिकारी उपासनी यांच्या चौकशीला वेग

  • अकार्यक्षम प्रशासन !

  • शाळेच्या कामकाजाकडे दुर्लक्ष !

श्री. नितीन उपासनी

नाशिक – ४ वर्षांपूर्वीच्या विविध आरोपांच्या अनुषंगाने महापालिकेच्या शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांच्या खात्यांतर्गत चौकशीची कागदपत्रे शिक्षण संचालकांकडे सादर करण्यात आली आहेत.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तत्कालीन प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांच्यावर धारिकांचा निपटारा न करणे, शाळेच्या कामकाजाकडे दुर्लक्ष करणे, निधी व्यय न करणे, तसेच विविध कारणांच्या अनुषंगाने आरोप ठेवत खात्यांतर्गत चौकशी चालू केली होती. (कामचुकारपणा करणार्‍या अशा अधिकार्‍यांना बडतर्फ करून घरी पाठवणे हीच शिक्षा त्यांना योग्य आहे. अशा अधिकार्‍यांमुळे शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी होते, हे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात कसे येत नाही ?- संपादक) चौकशीच्या अनुषंगाने प्रशासन विभागाने शिक्षण संचालक कार्यालय, पुणे येथे प्रस्ताव सादर केला होता. वर्ष २०१८ मध्ये या संदर्भात प्रस्ताव सादर केल्यानंतर ४ वर्षांनी शिक्षण संचालक कार्यालयाकडून महापालिकेला अंतिम स्मरणपत्र पाठवले. शासनाने या प्रकरणाची पुन्हा चौकशी चालू करण्याविषयी महापालिकेकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. (४ वर्षांनंतर शिक्षण संचालक झोपले होते का ? त्यांनी प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्वरित त्यावर कार्यवाही का केली नाही ? यामध्ये कुठेतरी पाणी मुरल्याचा संशय येतो. – संपादक)