संजय राऊत यांनी आचारसंहितेचा भंग केला ! – भाजप
मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी ६ आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले नसल्याचा दावा करत त्यांची नावे उघड केली आहेत. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप भाजपने केला आहे. ‘निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करावी. याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून अब्रूहानीचा दावा करणार आहोत’, असे भाजपने सांगितले आहे.