देहू येथे मुख्य कमानीवर दुर्मिळ शिलालेख आढळला !
पिंपरी – देहू गावातील जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या उत्तर दिशेला असलेल्या प्रवेशद्वाराच्या मुख्य कमानीवर नगारखान्याखाली दुर्मिळ शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ७ ओळींचा मराठी भाषेतील आहे. शिलालेखावर श्री क्षेत्र देहू येथे श्री रुक्मिणी पांडुरंग देव आणि तुकाराम महाराज यांचे देवालय आहे, तसेच त्या सभोवताली असलेल्या प्राचीन ओवर्या आणि त्याचा जीर्णोद्धार होण्याविषयीचा उल्लेख आहे.