जोतिबा डोंगरावर १ जुलैपासून माणसी ५ रुपये यात्रा कर !
जोतिबा (जिल्हा कोल्हापूर), १२ जून (वार्ता.) – जोतिबा डोंगरावर येणार्या भाविकांकडून प्रतिमाणसी आता १ जुलैपासून २ रुपयांऐवजी ५ रुपये यात्रा कर आकारण्यात येणार आहे. जोतिबा ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. भाविकांची वाढती संख्या पहाता जमा होणार्या यात्रा करातून ग्रामपंचायतीला सुविधा पुरवण्यात मर्यादा येत होत्या. त्यामुळे यात्रा कर २ रुपयांऐवजी ५ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या २ रुपयांप्रमाणे साधारणत: ५० लाख रुपये जमा होतात. ही रक्कम आता दीड कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. या करातूनच जोतिबा डोंगर येथील स्वच्छता, पाणी, वीजपुरवठा याची तरतूद केली जाते.