विद्यापिठांनी देशाला पुढे घेऊन जाणारी सामर्थ्यवान युवा पिढी घडवावी ! – रतन टाटा, उद्योगपती
मुंबई – विद्यापिठांनी नीतीमत्तेची कास धरून देशाला पुढे घेऊन जाणारी सामर्थ्यवान युवा पिढी घडवावी, असे मत प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी येथे व्यक्त केले. राजभवनात आयोजित केलेल्या ‘एच्.एस्.एन्.सी. समूह विद्यापिठा’च्या पहिल्या विशेष दीक्षांत समारंभात रतन टाटा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘मानद डॉक्टरेट’ प्रदान करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, ‘‘रतन टाटा हे केवळ उद्योगपती नाहीत, तर ते नम्रपणा आणि नीतीमूल्ये जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. नवउद्योजकांसाठी ते दीपस्तंभ आहेत.’’