पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना पाणीपुरवठा करतांना महापालिकेची कसरत !
पुणे – महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना पाणीपुरवठा करतांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर पाणीपुरवठा करतांना कसरत करावी लागत आहे. या गावांना पाणीपुरवठा करण्याकरता वर्ष २०२०-२०२१ च्या मेच्या तुलनेत १२ सहस्रांहून अधिक टँकर पुरवावे लागले आहेत. या वर्षी मेमध्ये महापालिकेला एकूण ३५ सहस्त्र ६८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला आहे, असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.