स्थानिक तापमानवाढीमुळे हिमालयावर ताण : अल्प उंचीवर उगवणारी झाडे आता अधिक उंचीवर आढळतात !
प्रदूषण आणि उष्णतेची लाट ही कारणे !
नवी देहली – जागतिक तापमानवाढीसह (‘ग्लोबल वॉर्मिंग’सह) आता स्थानिक तापमानवाढ झाल्याचे व्यापक परिणाम उत्तराखंडमधील हिमालयीन क्षेत्रात दिसून येत आहेत. हिमालयातील काही झाडे पूर्वी २ सहस्र ५०० ते ३ सहस्र ५०० मीटरच्या उंचीवर उगवत असत; परंतु तेथे तापमानात झालेल्या वाढीमुळे ती आता ४ सहस्र ५०० मीटर उंचीवर आढळून येत आहेत.
केवळ बर्फवृष्टीसाठी ओळखल्या जाणार्या भागात आता पाऊस पडू लागला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे हिमालयातील थर अनेक किलोमीटर मागे गेले आहेत, हे पूर्वीच्या अध्ययनातून स्पष्ट झाले होते. हा परिणाम शेकडो वर्षांचा आहे; परंतु स्थानिक तापमानवाढीमुळे अत्यल्प कालावधीत त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येत आहेत. उत्तराखंडमधील वरिष्ठ भूगर्भ संशोधक प्रा. एम्.पी.एस्. बिष्ट म्हणाले, स्थानिक तापमानवाढीमुळे वणवे पेटू लागले. उष्णतेची लाट आणि प्रदूषण, ही त्यामागील कारणे आहेत.
निसर्गावर असे होत आहेत परिणाम !१. उत्तराखंडमध्ये २ सहस्र ५०० मीटरच्या उंचीवर हिमालयातील ‘हिमालयन पॉप्युलर’ ही वनस्पती आढळून येत होती. त्याचे शास्त्रीय नाव ‘पॉप्युलस सिलियाटा’ आहे. हीच वनस्पती आता या उंचीवर नष्ट झाली; कारण या वनस्पतीला आवश्यक अशी थंडी आणि आर्द्रता या उंचीवर मिळत होती. आता ही वनस्पती ४ सहस्र ५०० मीटर उंचीवर मिळू लागली आहे. |
संपादकीय भूमिकाविज्ञानाने जेवढी प्रगती केली, तेवढ्या प्रदूषण आदी समस्या निर्माण झाल्या. त्या माध्यमातून नैसर्गिक असमतोल निर्माण झाला. पाश्चात्त्यांच्या विचारसरणीवर आधारित असलेले आधुनिक विज्ञान निसर्गानुकूल नसणे, हेच त्यामागील कारण आहे ! |