राजस्थानमधील काँग्रेसी मंत्र्याच्या मुलाने बलात्कार केलेल्या पीडितेवर आक्रमण
|
नवी देहली – येथील काँग्रेस सरकारमधील मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित याने एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप असून पीडितेने त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. ‘११ जून या दिवशी दोन जणांनी आक्रमण करून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप पीडितेेने केला. त्यांनी तिच्यावर एक द्रव फेकले, जे तिच्या चेहर्यावर आणि हातावर पडले. पीडितेने पोलिसांत नोंदवलेला गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांनी तिला धमकावले.
Goons attack the woman who had accused Rajasthan minister Mahesh Joshi’s son of rape, ask her to withdraw the case https://t.co/N0JDblKWTk
— OpIndia.com (@OpIndia_com) June 12, 2022
१. पीडितेने रोहित जोशी याच्यावर देहलीमध्ये बलात्कार करून बलपूर्वक गर्भपात करायला लावण्यासह अनेक गंभीर कलमांखाली पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.
२. तक्रारीत म्हटले आहे की, रोहितने पीडितेला अनेक वेळा गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला, तसेच तिला मारहाणही केली.
३. पीडितेने तिची आणि तिच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात असून तिला सुरक्षा पुरवण्याची मागणीही केली.
४. पोलिसांनी रोहितची सखोल चौकशी चालू केली असून त्याला त्याचा भ्रमणभाष पोलिसांकडे जमा करण्याचा आदेश दिला आहे. चौकशीच्या दुसर्या दिवशी पीडितेवर आक्रमण करण्यात आले.
संपादकीय भूमिका
|