सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्याकडून नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची धमकी

नवी देहली – तुम्ही पैगंबरांचा अवमान करून मोठी चूक केली आहे. मुसलमान प्रत्येक श्‍वास पैगंबरांसाठीच घेत असतो. त्यामुळे त्यांच्या अवमानाची शिक्षा शिरच्छेदच आहे, अशी धमकी देणारा सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या राजकीय पक्षाच्या एका नेत्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. एका मोर्च्याच्या वेळी त्याने हे विधान केले. या मोर्च्यामध्ये मुसलमानांनी हातात धरलेल्या फलकावरही अशाच प्रकारचे लिखाण असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारचे अन्य काही व्हिडिओही प्रसारित होत आहेत.

संपादकीय भूमिका

  • देशात कायदे आणि न्यायप्रणाली असतांना अशा प्रकारच्या धमक्या देण्याचे धाडस होतेच कसे ? याविषयी निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ? कि त्यांना अशा धमक्या मान्य आहेत ?
  • पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्‍या सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडियावरही बंदी घालण्याची मागणी हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी केली पाहिजे !