सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला असणाऱ्या ईश्वरी अधिष्ठानामुळे तेथे पुष्कळ प्रमाणात दैवी स्पंदने आकृष्ट होणे आणि त्याचा अधिवेशनातील वक्त्यांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

हिंदू अधिवेशनाविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनाथी, गोवा येथे ४ ते ७ जून २०१८ या कालावधीत ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले होते. ‘या अधिवेशनात मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांवर या सात्त्विक वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी अधिवेशनाच्या कालावधीत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केलेल्या चाचणीत ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत ५ वक्त्यांच्या त्यांनी मार्गदर्शन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला, तसेच अधिवेशनाच्या सभागृहाच्या स्वच्छतेपूर्वी आणि स्वच्छतेनंतरही ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या.

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

२. अधिवेशनातील वक्ते आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे विषय यांच्या संदर्भातील माहिती

३. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

३ अ. अधिवेशनाच्या सभागृहाची स्वच्छता करण्यापूर्वी त्या सभागृहात ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात असणे; पण त्या सभागृहाची स्वच्छता केल्यानंतर ती नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होणे : अधिवेशनाच्या सभागृहाची स्वच्छता करण्यापूर्वी तेथे ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती अन् तिची प्रभावळ २.२८ मीटर होती. सभागृहाची स्वच्छता केल्यानंतर तेथील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.

अधिवेशनाच्या सभागृहाची स्वच्छता करण्यापूर्वी आणि नंतरही तेथे ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

३ आ. अधिवेशनात मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवर वक्त्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा नसणे : अधिवेशनात मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवर वक्त्यांमध्ये मार्गदर्शनापूर्वी आणि नंतरही ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

३ इ. अधिवेशनाच्या सभागृहाची स्वच्छता केल्यानंतर तेथे पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे : अधिवेशनाच्या सभागृहाची स्वच्छता करण्यापूर्वी तेथे सकारात्मक ऊर्जा नव्हती. त्या सभागृहाची स्वच्छता केल्यानंतर तेथे पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली अन् तिची प्रभावळ २.८७ मीटर होती.

३ ई. अधिवेशनात मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवर वक्त्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असणे आणि त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होणे

या सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण ‘सूत्र ४’ मध्ये दिले आहे.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

४. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

४ अ. अधिवेशनाच्या सभागृहाची स्वच्छता साधकांनी अतिशय भावपूर्ण केल्यामुळे तेथील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तेथे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

डॉ. कौशिकचंद्र मल्लिक

४ आ. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तेथे पुष्कळ प्रमाणात दैवी स्पंदने आकृष्ट होणे : अखिल भारतीय हिंदू अधिवेनशनाचे आयोजन संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला दिशा देण्यासाठी करण्यात येते. ‘अधिवेशन आध्यात्मिक स्तरावर व्हावे’, यासाठी सनातनचे सद्गुरु आणि संत कार्यरत असतात, तसेच सनातनचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अधिवेशनातील सर्व सेवा भावपूर्ण करतात. यांमुळे या अधिवेशनाला ईश्वर, सप्तर्षी, गुरु आणि संत यांचे भरभरून आशीर्वाद मिळतात. अधिवेशनाला असलेल्या ईश्वरी अधिष्ठानामुळे तेथे पुष्कळ प्रमाणात दैवी स्पंदने आकृष्ट झाली. त्यामुळे तेथील वातावरण अतिशय सात्त्विक बनले.

श्री. रमेश शिंदे

४ इ. अधिवेशनातील वक्त्यांची साधना आणि आध्यात्मिक पातळी यांनुसार त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ असणे : अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांची भाषणापूर्वीची, म्हणजे आरंभीची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ त्यांची साधना अन् आध्यात्मिक पातळी यांनुसार होती, हे पुढील विवेचनावरून लक्षात येईल.

१. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे गेली २४ वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. त्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २.४८ मीटर होती.

२. डॉ. कौशिकचंद्र मल्लिक हे सक्रीय हिंदुत्वनिष्ठ असून या अधिवेशनामध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २.५६ मीटर होती.

३. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे १२ वर्षांपूर्वी सनातन संस्थेच्या संपर्कात आले. तेव्हापासून ते साधना करत असून न्यायालयीन धर्मकार्यात सहभागी आहेत. तेव्हा आध्यात्मिक पातळी ६८ टक्के होती. (वर्ष २०१९ मध्ये ते संतपदी विराजमान झाले.) त्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३.५५ मीटर होती.

४. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर हे दोघेही गेली २२ ते २५ वर्षे साधना करत असून त्यांची आध्यात्मिक पातळी अनुक्रमे ८१ टक्के आणि ८४ टक्के आहे. (ही आध्यात्मिक पातळी वर्ष २०१८ ची आहे.) त्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अनुक्रमे ५.४० मीटर आणि ८.५० मीटर होती.

यावरून लक्षात येते की, व्यक्तीतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ तिची साधना अन् आध्यात्मिक पातळी यांनुसार वाढत जाते. जेवढी आध्यात्मिक पातळी अधिक, तेवढी ईश्वरी चैतन्य ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते.

सौ. मधुरा कर्वे

४ ई. अधिवेशनातील वक्त्यांना त्यांनी मांडलेल्या विषयांनुरूप आवश्यक तेवढी शक्ती (चैतन्य) ईश्वराकडून मिळणे : ईश्वरी कार्यात सहभागी झालेल्या व्यक्तींना आपोआपच ईश्वरी चैतन्य मिळते, तरीही ईश्वर काटकसरी आहे. तो प्रत्येकाला ज्याचा-त्याचा भाव, तळमळ आणि आवश्यकता यांनुसार कार्यासाठी बळ देत असतो. या चाचणीतही याचाच प्रत्यय आला. वक्त्यांच्या विषयानुसार त्यांना ईश्वराकडून चैतन्य मिळाले; त्यामुळे मार्गदर्शनानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढली. याची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील विषय अधिवेशनात मांडला. ते मांडत असलेल्या विषयाची व्याप्ती पुष्कळ मोठी होती. त्यासाठी त्यांना ईश्वराकडून अधिक प्रमाणात चैतन्य मिळून त्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २.०८ मीटरने वाढली. या तुलनेत डॉ. कौशिकचंद्र मल्लिक आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मार्गदर्शनानंतर अल्प प्रमाणात वाढली.

२. अधिवेशनात अनिष्ट शक्ती अडथळे आणतात. संतांच्या अस्तित्वाने आणि त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे ते अडथळे दूर होतात, तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांच्या अंतर्मनापर्यंत तो विषय पोचतो. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनाचा विषय समष्टी साधनेशी आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा व्यष्टी साधनेशी संबंधित होता. मार्गदर्शनानंतर सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अनुक्रमे १.५० मीटर अन् १.४४ मीटरने वाढली.

यावरून विषयानुरूप आवश्यक तेवढी शक्ती ईश्वराकडून त्यांना मिळाली, हे लक्षात येते, तसेच ईश्वराचे नियोजन किती काटेकोर असते, हेही लक्षात येते. ईश्वर आवश्यकतेनुसार त्याची शक्ती धर्मकार्य करणाऱ्यांना देऊन त्यांच्याकडून ते कार्य कशा प्रकारे करवून घेतो, हे लक्षात येते.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.६.२०१८) ई-मेल : mav.research2014@gmail.com