लोकहो, १९४७ मध्ये विन्स्टन चर्चिल यांनी लक्षात आणून दिलेली चूक सुधारून लवकरात लवकर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करा !
वर्ष १९४७ मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान ॲटली यांनी ब्रिटीश संसदेत भारताला स्वातंत्र्य देण्याचे विधेयक मांडले. त्याला कडाडून विरोध करतांना विन्स्टन चर्चिल म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे; परंतु भारतातील या बिकट समयी काँग्रेसच्या हाती शासनसूत्रे देणे म्हणजे कोट्यवधी भुकेकंगालांचे दैव लुच्चे, लबाड अन् लुटारू यांच्या हाती देणेच होय. पाण्याची शिशी वा ‘ब्रेड’चा तुकडासुद्धा करआकारणीतून सुटणार नाही. हवा तेवढी करमुक्त राहील. राजकीय कालगतीमध्ये हिंदुस्थान हरवून जाईल !’’
चर्चिलचे हे लागट, निंदायुक्त आणि तुच्छ लेखणारे मत किती द्रष्टेपणाचे होते, हे काँग्रेसने वारंवार सिद्ध केले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७ दशकांनंतर काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी देश सर्वार्थाने रसातळाला नेला आहे. १८५७ या वर्षी चालू झालेली राज्यक्रांती अद्यापही अपूर्णच आहे. ‘हिंदु-राष्ट्र’ स्थापन झाल्यावरच ती पूर्ण होईल !
(संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’)