बलात्काऱ्यांचा देश ब्रिटन !
‘बलात्कारी आणि कठोर शिक्षा’ हे समीकरण सर्वांनाच अपेक्षित असते; पण ब्रिटनमध्ये काहीसा अजबच आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन बलात्कारित मुलींची क्षमा मागितल्याने त्यांच्यावर अत्याचार केलेल्या ‘ग्रूमिंग गँग’ (लहान मुलांना आमीष दाखवून त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करणारी टोळी) मधील ८७० मुसलमानांचे गुन्हे माफ करण्यात आले आहेत. हे वृत्त वाचून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात शिरेल ! खरे पहाता बलात्काऱ्यांना ‘माफी’ हा प्रकार असूच शकत नाही; कारण असे करणे म्हणजे त्यांना पाठीशी घालणे, त्यांचे समर्थन करणे आणि अप्रत्यक्षरित्या बलात्काराचे उदात्तीकरण करण्यासारखेच आहे. ‘माफ केले’ म्हणजे सगळे अपराध धुतले गेले, असे होऊ शकत नाही. त्यामुळे ब्रिटनसारख्या मोठ्या आणि विकसित देशाकडून हे अपेक्षितच नव्हते. ब्रिटनने या बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा करून संपूर्ण विश्वापुढे आदर्श निर्माण करायला हवा होता; पण तसे काहीच झाले नाही. आदर्श तर सोडाच; पण साधी शिक्षाही केली न जावी, यापेक्षा दुसरा लाजिरवाणा प्रकार कोणता असेल ? आज माफ केलेले गुन्हेगार उद्या पुन्हा बलात्कार करणार नाहीत कशावरून ? गुन्हे माफ करण्यामुळे त्यांना काही धाकच उरणार नाही. यातूनच ब्रिटनची असंवेदनशीलता दिसून येते.
मुसलमानसमर्थक ब्रिटन !
कोणताही गुन्हा क्षम्य नसतोच. त्यामुळे गुन्हेगाराला गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार न्यून-अधिक प्रमाणात शिक्षा ही व्हायलाच हवी. बलात्कार यातनामय आणि पाशवी असतो. त्या वेळी पीडित महिलेला किती वेदना होतात, ती किती टाहो फोडत असते, हे कुणाला समजू शकत नाही; पण म्हणून त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. बलात्कार असे दडपले जाऊ लागले, तर देश-विदेशात किती हाहाःकार आणि दहशत माजेल, याची कल्पनाही करू शकत नाही. असे झाले, तर महिलांच्या सुरक्षेशी खेळ मांडल्यासारखेच होईल ! मुसलमान बलात्काऱ्यांना एका झटक्यात माफ करून टाकणारा ब्रिटन पाहिला, तर ‘ब्रिटनने बलात्कारी मुसलमानांचा ठेका घेतला आहे का ?’, असा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनी राबवलेल्या एका मोहिमेच्या अंतर्गत या गुन्हेगारांना क्षमा केली जात आहे; मात्र यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतील, याचा विचार ब्रिटनने केलेला दिसत नाही.
क्रूर थट्टा !
‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।’, असे मनुस्मृतीत सांगितले आहे. याचा अर्थ जेथे स्त्रियांची पूजा होते, तेथे देवता वास करतात आणि जेथे त्यांची पूजा होत नाही किंवा त्यांना सन्मान दिला जात नाही, तेथे चांगली कर्मेही निष्फळ ठरतात. ब्रिटन तसा पुढारलेला देश. या देशात ‘स्त्रीवाद’, ‘स्त्रीमुक्ती’ हे विषय वारंवार चघळले जातात; मात्र ज्या वेळी स्त्रीला न्याय देण्याची वेळ येते, तेव्हा ब्रिटन स्त्रीविरोधी भूमिका घेऊन मोकळा होता. बलात्कार हा स्त्रियांची लज्जा, अब्रू यांच्याशी संबंधित असतो. त्यामुळे हा गुन्हा अतिशय क्रूर अशा प्रकारात गणला गेला पाहिजे आणि त्यानुसार शिक्षेचे स्वरूप ठरवले गेले पाहिजे. छत्रपती शिवरायांनी स्त्रीसमवेत गैरवर्तन करणाऱ्या रांझाच्या पाटलाचा चौरंगा केला होता; म्हणजे त्याचे हात-पाय तोडले होते. कोणत्याही बलात्काऱ्यासाठी खरेतर अशीच शिक्षा असायला हवी. त्याविना हे असले प्रकार थांबणार नाहीत. ‘तात्काळ शिक्षा आणि तात्काळ कार्यवाही’ हे शिवरायांचे धोरण सर्वच देशांनी कार्यान्वित केल्यास अनेक देश गुन्हेमुक्त होतील. शिक्षा न करता गुन्हेगारांना माफ करणे म्हणजे ब्रिटनने समस्त महिलावर्गाची केलेली क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. ब्रिटनमधील अल्पवयीन पीडित बलात्कारित मुलींचा विचार तर कुणीच करतांना दिसत नाही. गुन्हे माफ करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही. मानवाधिकारवाले किंवा स्त्री स्वातंत्र्यवाले एरव्ही जरा काही खुट्ट झाले की, त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड करत स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण ब्रिटनमधील पीडितांच्या संदर्भात घडलेल्या कृत्याविषयी ना त्यांनी आवाज उठवला, ना त्यांच्या पाठीशी कुणी उभे राहिले ! हे संतापजनक नव्हे का ?
गुन्हा माफ करण्यात ‘क्षमाशीलता’ हा जरी सद्गुण असला, तरी त्याचा अपलाभ उठवला जाऊ नये. ‘क्षमा करण्यात येणारा गुन्हेगार खरोखर त्या पात्रतेचा आहे का ?’, याची चौकशी व्हायला हवी. ब्रिटनने जे केले, त्यामागील कारणांचाही शोध घ्यायला हवा. ‘गुन्हे माफ करण्याला राजकीय वर्चस्व कारणीभूत होते कि सामाजिक दबाव आड आला ?’, याच्या मुळाशी जायला हवे. ‘गेल्या ४० वर्षांमध्ये ५ लाख गैरमुसलमान मुलींवर युनायटेड किंगडममध्ये मुसलमानांनी बलात्कार केले आहेत’, हे वास्तव एका बलात्कारपीडित महिलेने मध्यंतरी उघड केले होते. ४० वर्षांत घडलेल्या घटनांचा न्याय पीडित महिलांना आता कोण आणि कधी मिळवून देणार ? आज जे ब्रिटनमध्ये घडले, त्याचे अनुकरण उद्या अन्य देशांनीही करायचे ठरवले, तर संपूर्ण जग बलात्कारी होण्यास वेळ लागणार नाही. बलात्कारासारखा घृणास्पद आणि रानटी प्रकार करणारे गुन्हेगार कधीही मोकाट सुटता कामा नयेत. भविष्यात संपूर्ण जगात बलात्काऱ्यांचा सुळसुळाट झाला, तर यासाठी कुणीही ब्रिटनलाच सर्वस्वी उत्तरदायी ठरवल्यास चुकीचे होणार नाही. ‘बलात्काऱ्यांचे माहेरघर’ या नावानेच ब्रिटन कदाचित् नावारूपाला येईल ! ब्रिटनने अशा समाजघातकी आणि स्त्रीद्वेष्ट्या निर्णयासाठी संबंधित महिलांची क्षमा मागितली पाहिजे; पण तसे होणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांना मोकाट सोडणाऱ्या ब्रिटनलाच आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व देशांनी वेळीच खडसवायला हवे आणि संबंधित आरोपींना कठोर शासन होईपर्यंत ब्रिटनचा जागतिक स्तरावर निषेध व्यक्त करत त्याच्यावर सर्वदृष्ट्या बहिष्कारच घालायला हवा, तरच ब्रिटनला उपरती होईल.
‘बलात्काऱ्यांना तात्काळ शिक्षा’ हे शिवरायांचे धोरण सर्वच देशांनी कार्यान्वित केल्यास स्त्री सुरक्षित राहील ! |