देशात गेल्या २४ घंट्यांत ८ सहस्रांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद !
नवी देहली – भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ घंट्यांत देशामध्ये ८ सहस्र ३२९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून सक्रीय रुग्णांची संख्या ४० सहस्र ३७० वर पोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ घंट्यांत ४ सहस्र २१६ लोक कोरोनामुक्त झाले आहेत, तर १० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातही कोरोना संसर्गाचे वाढत आहे प्रमाण !
महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. गेल्या २४ घंट्यांत महाराष्ट्रात ३ सहस्र ८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केवळ मुंबईतच १ सहस्र ९५६ नवे कोरोनाबाधित आढळून आले.