नूपुर शर्मा प्रकरणी रांची (झारखंड) येथील मुसलमानांच्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू
रांची (झारखंड) – येथे शुक्रवार, १० जूनच्या नमाजानंतर मुसलमानांनी नूपुर शर्मा यांच्या अटकेच्या मागणीसाठी हिंसाचार केला. या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला, तर ८ दंगलखोर मुसलमान आणि ४ पोलीस घायाळ झाले. यात एक आयपीएस् अधिकार्याचाही समावेश आहे. महंमद कैफी (वय २२ वर्षे) आणि महंमद साहिल (वय २४ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यासह हवेत गोळीबारही केला. (हवेत गोळीबार करून कधी दंगल थांबते का ? – संपादक) सध्या येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
Islamist violence over Nupur Sharma’s remark: 2 rioters dead in Ranchi after police retaliated to firing by mob, Yogi Adityanath govt arrests 229 riotershttps://t.co/ii38RwfUdg
— OpIndia.com (@OpIndia_com) June 11, 2022
पोलीस अधीक्षक सुरेंद्र कुमार झा यांनी सांगितले की, शुक्रवारच्या नमाजानंतर मशीद आणि तेथील परिसरातून प्रथम दगडफेक करण्यात आली. नंतर गोळीबारही करण्यात आला. या वेळी त्यांच्यावर नियंत्रण मिळवतांना आम्हाला अनेक अडचणी आल्या.
हनुमान मंदिराची तोडफोड
मुसलमानांकडून येथील हनुमान मंदिराची तोडफोड करण्यात आली. येथील दुकानदारांनी सांगितले की, मुसलमानांनी मंदिराचा दरवाजा, झेंडा आदींची हानी केली. यासह प्रसादाच्या दुकानातील प्रसाद खाली पाडले. या वेळी हिंदु संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलीस आल्यानंतर मुसलमान निघून गेले.
संपादकीय भूमिकाझारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने तेथे अशा दंगलखोरांवर तात्काळ कारवाई करण्यात न आल्याचाच हा परिणाम आहे ! असे शासनकर्ते कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी राखतील का ? त्यांना निवडून देणार्या जनतेलाही हीच शिक्षा योग्य, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! |