(म्हणे) ‘सर्वाेच्च श्रद्धास्थानांविषयी चुकीचे उद्गार काढत असल्यास राग येणे स्वाभाविक !’
धर्मांधांचा पुळका असणारे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य
मुंबई – भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन होणार असल्याची माहिती कालच मिळाली होती. त्या दृष्टीने सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले होते. सोलापूर, संभाजीनगर आणि जालना यांसह राज्यात ठिकठिकाणी मुसलमान समाजाने शांततेत आंदोलन केले. सर्वाेच्च श्रद्धास्थानांविषयी, जर कुणी अशाप्रकारे चुकीचे उद्गार काढत असेल, तर राग येणे स्वाभाविक आहे, असे धर्मांधांविषयी सहानभूती असणारे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. (आजपर्यंत अनेक वेळा हिंदु देवता, राष्ट्रपुरुष यांच्याविषयी निंदानालस्ती करणारी मते, त्यांच्याविषयी विकृत अश्लाघ्य वक्तव्ये धर्मांधांकडून प्रसारित होतात. त्यावर कधी गृहमंत्र्यांनी ‘हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी चुकीचे वक्तव्य करणे अयोग्य आहे’, असे मत व्यक्त केल्याचे ऐकीवात नाही ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या गृहमंत्र्यांकडून जर प्रत्येक वेळी धर्मांधांची बाजू घेतली जाणार असेल, तर असा गृहविभाग हिंदूंना कधीतरी न्याय देईल का ? – संपादक)