पालघर जिल्ह्यात बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ !
८ मासांत ४३३ बालकांचा मृत्यू
विरार – पालघर जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गेल्या ८ मासांत ० ते ५ वयोगटातील ४३३ बालकांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला. जानेवारी ते एप्रिल या काळात ३९ नवजात बालकांचा, तर ० ते ५ वयोगटातील ९१ बालकांचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यात बालकांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सक्षम अत्याधुनिक आरोग्य यंत्रणाचा अभाव हे बालकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. त्यात रुग्णालयांचा अभाव, बालकांची अपुरी वाढ, आजारी माता, कुपोषित माता आदींचा समावेश आहे. अल्प वजनाची बालके हा सर्वांत मोठा घटक आहे. पालघर जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी हे पद मागील ८ वर्षांपासून रिक्त आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात केवळ ३ बालरोगतज्ञ उपलब्ध आहेत, तर ९ पदे रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य विभागात अद्यापही कायमस्वरूपी आणि कंत्राटी पदे मिळून ९७३ पदे रिक्त आहेत.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बालमृत्यूचे प्रमाण वाढणे ही स्थिती राज्यासाठी दयनीय ! |