रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर कु. सिद्धी विक्रम महामुनी (वय १३ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे
१. ‘रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मला नामजपाचे, तसेच वेळेचेही महत्त्व समजले. मी ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर माझा नामजप चांगला होत होता; परंतु मी घरी नामजपाला बसल्यावर मला कंटाळा येतो किंवा झोप येते.
२. आश्रमात साधकांना पुष्कळ सेवा असतात, तरीही त्यांची चिडचिड होत नाही; परंतु मला घरात एखादे काम करायला सांगितल्यावर माझी चिडचिड होते’, हे माझ्या लक्षात आले.
३. आश्रमातील साधक सेवा करत असल्याने प्रत्येकाचा तोंडवळा हसतमुख दिसत होता. तेव्हा ‘मलाही साधना करायला हवी’, याची जाणीव झाली.
४. बहुविकलांग संत पू. सौरभदादा यांची भेट झाल्यावर ‘त्यांना पुष्कळ त्रास असूनही त्यांचा तोंडवळा सतत आनंदी असतो; परंतु ‘मला थोडे जरी लागले, तरी त्रास होऊन मी रडत बसते’, असे माझ्या लक्षात आले.’
– कु. सिद्धी विक्रम महामुनी (वय १३ वर्षे), कोरेगाव, जिल्हा सातारा. (२१.३.२०२०)