राष्ट्रपती पदासाठी १८ जुलैला मतदान !
नवी देहली – राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली असून १५ व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान, तर २१ जुलैला मतमोजणी होणार आहे. नवनियुक्त राष्ट्रपती २५ जुलै या दिवशी शपथ घेतील. या निवडणुकीसाठी होणार्या मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
#Presidentialpolls will be held on July 18 and the result will be declared on July 21. Special pens will be used to mark votes in the polls.
(@Aishpaliwal)https://t.co/7ZS3J0akcY— IndiaToday (@IndiaToday) June 9, 2022
भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै या दिवशी संपत असून त्यांना दुसर्यांदा संधी दिली जाण्याची शक्यता नाही.