अंबरनाथ येथे आगीत २ गोदामे भस्मसात !
ठाणे, ९ जून (वार्ता.) – अंबरनाथ पूर्व येथील पाले भागातील २ गोदामांना ८ जूनच्या मध्यरात्री भीषण आग लागली. या गोदामांमध्ये स्वच्छताद्रव्य आणि तेलाच्या प्रकारातील रंग असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली. गोदामांतील पिंपांचे मोठमोठे स्फोट झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ६ गाड्यांच्या साहाय्याने ४ घंट्यांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. रात्रीची वेळ असल्याने गोदामांमध्ये कुणीही नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दोन्ही आस्थापने जळून भस्मसात झाली आहेत. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.