वांद्रे येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू !
१६ जण गंभीर घायाळ
मुंबई – वांद्रे परिसरात मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ३ मजली इमारत कोसळली असून या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीर घायाळ झाले आहेत. वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथक, अग्नीशमन दलाच्या गाड्या, तसेच पोलीस घटनास्थळी आले. बचावकार्य तात्काळ चालू करण्यात आले. घायाळ झालेले सर्वजण बिहारमधील मजूर आहेत.