संभाजीनगर येथे फर्निचरच्या दुकानात बाँबसदृश वस्तू !

प्रतिकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – येथील कन्नड शहरातील एका फर्निचरच्या दुकानातील भ्रमणभाषच्या खोक्यात बाँबसदृश वस्तू सापडली आहे. ९ जून या दिवशी सकाळी दुकानदाराने भ्रमणभाषचे खोके उघडून पाहिले असता त्यात बाँबसारखी वस्तू आढळली. दुकानदाराने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या वस्तूचे अन्वेषण चालू केले, तसेच हा परिसर निर्मनुष्य केला आहे. गेल्या आठवड्यात सरस्वती भूवन महाविद्यालय परिसरात बाँब सापडल्याची अफवा पसरली होती; मात्र अखेर ती ‘पॉवरबँक’ निघाली होती.