संभाजीनगर येथे कोरोनाचे ६ रुग्ण आढळले, मृत्यू नाही !

संभाजीनगर – जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३ वरून ६ वर पोचली. ६ जून या दिवशी शहरात ५, तर ग्रामीण भागात १ रुग्ण आढळला. त्यामुळे सध्या ७ रुग्णांवर उपचार चालू आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण अल्प झाले होते; मात्र मागील ४ दिवसांपासून शहरात रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ सहस्र ८०७ रुग्ण आढळले. त्यापैकी १ लाख ६६ सहस्र ६२ रुग्ण बरे झाले. एकूण ३ सहस्र ७३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.