सोलापूर येथे ‘वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवना’चे भूमीपूजन !

भूमीपूजन प्रसंगी उपस्थित  पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि अन्य मान्यवर

सोलापूर, ७ जून (वार्ता.) – कुंभार वेस येथील जय भवानी मैदानात ‘वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवना’चे भूमीपूजन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ६ जून या दिवशी करण्यात आले. या वेळी आमदार यशवंत माने, श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य, श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी महापौर महेश कोठे, धर्मराज काडादी, संतोष पवार यांसह लिंगायत समाजातील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी प्रास्ताविकात महेश कोठे यांनी सांगितले की, कन्नड भवनाचा वापर लिंगायत समाजातील मुलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी केला जाईल. मुलांच्या रहाण्याची, तसेच अभ्यासाची सोय येथे होणार आहे. बहुउद्देशीय सभागृह म्हणून कन्नड भवनचा उपयोग होणार आहे.