कृष्णा नदीत सांगली येथे पाणी अल्प झाल्याने २ पाणी उपसा पंप बंद !
सांगली, ७ जून (वार्ता.) – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अल्प होणाऱ्या पाण्याने कृष्णा नदीने आयर्विन पूल येथे तळ गाठला असून ७ जून या दिवशी केवळ ३ फूट पाण्याची पातळी नोंदवली गेली. पाण्याची पातळी अल्प झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी उपसा करणाऱ्या ३ पैकी २ पंप उघडे पडले आहेत, यामुळे सांगलीकरांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. तरी नागरी आणि औद्योगिक क्षेत्रांतील नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.