४ भारतीय महिलांना त्रास झाल्याने ‘जातीय समानते’विषयी कार्यक्रमाचे आयोजन ! – तनुजा गुप्ता यांचा हास्यास्पद दावा
‘गूगलच्या व्यवस्थापनाने माझ्यावर चौकशी आणि दंडात्मक कारवाईची प्रक्रिया चालू केली. त्यामुळे मला त्यागपत्र देणे भाग पडले’, असा आरोप कार्यक्रमाच्या आयोजक तनुजा गुप्ता यांनी केला आहे. निरोपाच्या पत्रात त्यांनी लिहिले, ‘११ वर्षांपासून मी आस्थापनात असल्याने माझ्याकडे नोकरी सोडण्यासाठी अनेक कारणे होती. आस्थापनात जातीय समानतेला प्रोत्साहन देण्याच्या प्रक्रियेत ४ भारतीय महिलांना त्रास झाल्याचे दिसले. ‘आम्हाला कार्यस्थळी जातीवर आधारित भेदभावाचा सामना करावा लागत आहे’, अशी गोपनीय माहिती २ महिला कर्मचाऱ्यांनी मला दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांत जातीय भेदभावाच्या सूत्रासंदर्भातील माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता’, असे हास्यास्पद स्पष्टीकरण तनुजा गुप्ता यांनी दिले आहे.
संपादकीय भूमिका
|