अमेरिकेच्या ‘गूगल’मधील हिंदु कर्मचाऱ्यांच्या संघटित विरोधामुळे हिंदुद्वेष्ट्या विचारवंत सुंदरराजन् यांचा कार्यक्रम रहित !
कॅलिफोर्निया (अमेरिका) – अमेरिकेतील गूगल आस्थापनामध्ये हिंदु कर्मचाऱ्यांच्या संघटित विरोधामुळे हिंदुद्वेष्ट्या विचारवंत थेनेमोजी सुंदरराजन् यांचा कथित ‘जातीय समानते’वर आधारित कर्मचाऱ्यांसाठीचा कार्यक्रम रहित करण्यात आला. ‘गूगल न्यूज’च्या वरिष्ठ व्यवस्थापक तनुजा गुप्ता यांनी कर्मचाऱ्यांना ‘जातीय समानता’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी ‘इक्वॅलिटी लॅब्ज’च्या संस्थापक थेनेमोझी सुंदरराजन् यांना बोलावले होते; परंतु त्यास प्रखर विरोध झाल्याने गूगलच्या व्यवस्थापनाने कार्यक्रम रहित केला. दुसरीकडे ‘सुंदरराजन् यांना आमंत्रित केल्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे’, असे म्हणत या कार्यक्रमाच्या आयोजक तनुजा गुप्ता यांनी नोकरी सोडली. तेव्हा हे सूत्र चर्चेत आले.
सुंदरराजन् यांच्या कार्यक्रमाची चर्चा होताच गूगलमधील काही हिंदु कर्मचाऱ्यांनी सुंदरराजन् या हिंदुद्वेष्ट्या असल्याने त्यास विरोध केला. गूगलच्या ८ सहस्र भारतीय-अमेरिकी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापकाला एक अंतर्गत ई-मेल पाठवला. याची व्यवस्थापनाने नोंद घेऊन कार्यक्रम रहित केला.
संपादकीय भूमिका
|