हिजाबबंदीला विरोध करणाऱ्या २४ महाविद्यालयीन विद्यार्थीनी निलंबित

प्रातिनिधिक छायाचित्र

मंगळुरू (कर्नाटक) – हिजाबबंदीला विरोध केल्याच्या प्रकरणी मंगळुरूस्थित महाविद्यालयाने २४ विद्यार्थीनींना निलंबित केले. निलंबित केलेल्या सर्व उप्पिनंगडी सरकारी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. या विद्यार्थीनींवर महाविद्यालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ७ विद्यार्थीनींना निलंबित करण्यात आले होते. याविषयीचे वृत्त प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करणार्‍या पत्रकारांवर त्यांनी आक्रमणही केले होते.

कर्नाटक सरकारने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करणे अनिवार्य केले आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरवला आहे.

संपादकीय भूमिका

आता अशा विद्यार्थीनींना कुणी कट्टरतावादी का म्हणत नाही ?