भगवान शिवाचे लिंग सापडले कि दगड ?
समाजवादी पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते लाल बिहारी यादव यांचे संतापजनक विधान
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते लाल बिहारी यादव यांनी ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगावरून भगवान शिवाविषयी आक्षेपार्ह आणि अश्लील विधान केले आहे. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
‘भगवान शिव का *#@ जहाँ-जहाँ गिरा होगा वो गल गया होगा’: सपा नेता की शिवलिंग पर अश्लील टिप्पणी, पूछा- वो आदमी थे या पत्थर?#SamajwadiParty #Shivling https://t.co/KYBton3KtI
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 6, 2022
यादव यांनी यात म्हटले आहे की, भगवान शिव मनुष्य होते कि दगड ? तेथे शिवाचे लिंग सापडले आहे कि दगड ? शिवलिंग असते, तर ते विरघळले असते. भगवान शिव यांचे लिंग जेथे जेथे पडले, ते जर मांस आणि हाड यांचे असेल, तर तेथेच ते विरघळले असेल आणि जर दगडाचे असेल, तर तेथे पडून राहिले असेल.
(सौजन्य : TIMES NOW)
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
यादव यांच्या या विधानाच्या विरोधात हिंदु युवा वाहिनीने आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळला. त्यांनी क्षमा मागावी अन्यथा असेच आंदोलन करण्यात येईल, असे या संघटनेकडून सांगण्यात आले. यादव यांनी एका वृत्तवाहिनीवर याविषयी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय भूमिका
|