धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य !
मुंबई – धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. १६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विषयावर ६ जून या दिवशी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यात सुमारे १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यात आले आहेत. राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.