गॅस सिलेंडर साठवल्याच्या प्रकरणी इंडेन गॅस एजन्सीच्या प्रमुखांसह धर्मांधावर गुन्हा नोंद !
सोलापूर – येथील मजरेवाडी परिसरात पत्र्याच्या खोलीत भरलेले ४० गॅस सिलेंडर आणि ३९ रिकामे गॅस सिलेंडर अवैधपणे साठवून ठेवल्याच्या प्रकरणी ‘इंडेन गॅस एजन्सी’च्या प्रमुख विद्या लोलगे आणि जाकीर अब्दुल सत्तार सय्यद यांच्यावर एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. जाकीर अब्दुल सत्तार सय्यद याला पोलिसांनी अटक केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंके यांनी एम्.आय.डी.सी. पोलिसात ४ जून या दिवशी तक्रार दिली होती.
सय्यद याच्या घराशेजारी पत्र्याच्याशेडमध्ये अवैधरित्या गॅस सिलेंडर साठवून ठेवले होते, तसेच इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने दुसऱ्या रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरतांना आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. जाकीर सय्यद हा विद्या लोलगे यांच्याशी संगनमताने हा प्रकार करत होता, असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.