आतंकवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा
वाराणसी येथील वर्ष २००६ च्या साखळी बाँबस्फोटांचे प्रकरण
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – वाराणसी येथील श्री संकटमोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानक येथे ७ मार्च २००६ या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जिहादी आतंकवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा सुनावली.
16 साल बाद आया अदालत का फैसला, आतंकी वलीउल्लाह को सजा-ए-मौत#Varanasi | #VaranasiBlast https://t.co/86wAHiH4nc
— Zee Salaam (@zeesalaamtweet) June 6, 2022
या स्फोटांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३५ हून अधिक लोक घायाळ झाले होते. त्याच दिवशी संध्याकाळी वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावरही स्फोटके सापडली होती. वाराणसीच्या अधिवक्त्यांनी वलीउल्लाह याचा खटला लढण्यास नकार दिला होता. यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे प्रकरण गाझियाबाद जिल्हा न्यायाधिशांच्या न्यायालयात वर्ग केले होते.
संपादकीय भूमिका१६ वर्षांनंतर न्याय मिळणे, हा पीडितांवर अन्यायच होय ! अशा घटनांमधील उत्तरदायींना तात्काळ शिक्षा मिळल्यास अशा घटना रोखण्यास साहाय्य होईल ! |