(म्हणे) ‘श्रीकृष्णाचे तरुणपणी महिलांशी अनैतिक संबंध होते !’
तमिळनाडूतील ‘विदुथलाई चिरुथैगल कत्छी पक्षा’चे प्रवक्ते विक्रमन् यांचे हिंदुद्रोही विधान
(‘विदुथलाई चिरुथैगल कत्छी’, म्हणजे स्वतंत्र पँथर पक्ष)
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू राज्यातील ‘विदुथलाई चिरुथैगल कत्छी पक्षा’चे प्रवक्ते विक्रमन् यांनी पुराणाचा संदर्भ देत इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाइम्स नाऊ’वरील चर्चासत्रामध्ये ‘कृष्णाचा युवा असतांनाचा काळ वृंदावनच्या महिलांसमवेत अनैतिक प्रेमसंबंधांनी भरलेला होता. याला ‘रासलीला’ म्हटले जाते’, असे हिंदुद्रोही विधान केले.
Tamil Nadu: DMK ally VCK Spokesperson R Vikraman Made Several Derogatory Comments on Lord Krishna#TamilNadu #DMK #AntiHindu https://t.co/oWidfEEnci
— Organiser Weekly (@eOrganiser) June 5, 2022
‘Krishna’s youthful career was full of illicit intimacy …’ @RVikraman quotes ‘puranas’ to speak about Rasaleela
‘Puranas are a symbolic representation. When somebody says Ravana has 10 heads ..,’ @RahulEaswar contradicts@thenewshour AGENDA | @PadmajaJoshi pic.twitter.com/6kqRYRFJD0
— TIMES NOW (@TimesNow) June 3, 2022
हिंदूंच्या देवतांविषयी अशा प्रकारची विधाने करणे, हा हिंदुद्वेष ! – राहुल ईश्वर, हिंदुत्वनिष्ठ
विक्रमन् यांच्या या विधानावर हिंदुत्वनिष्ठ श्री राहुल ईश्वर म्हणाले, ‘‘तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही देवतेचा अमान करू शकत नाही. पुराण हे प्रतीकात्मक आहे. ते जसेच्या तसे घेतले जाऊ शकत नाही. रावणाला १० मुखे होती. याचा अर्थ ‘त्याच्यात १० मेंदूंइतकी बुद्धीमत्ता होती. यातून ते किती विद्वान होते’, हे सांगण्याप्रमाणे हा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कुणी ‘श्री अयप्पा हे भगवान शिव आणि विष्णु यांचे पुत्र आहेत’, असे सांगतात, तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की, भगवान शिव आणि विष्णु यांनी विवाह केला होता. त्या दोघांच्या आध्यात्मिक शक्तीमुळे श्री अय्यपा यांची उत्पत्ती झाली. त्याच प्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे गोपींशी अनैतिक नाही, तर आध्यात्मिक नाते होते. हिंदूंच्या देवतांविषयी अशा प्रकारची विधाने करणे, हे हिंदुद्वेषाखेरीज काही नाही. अशा प्रकारे लोक हिंदु संस्कृती आणि मान्यता यांना हीन दाखवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी अश्लील आणि आक्षेपार्ह विधाने करतात.’’
मदुराईमध्ये नास्तिकतावादी पक्षांकडून हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्या घोषणा
या चर्चासत्राच्या आधी, म्हणजे २९ मे या दिवशी मदुराई येथे ‘द्रविड विदुथलाई कझगम‘, ‘पॉप्युुलर फ्रंट ऑफ इंडिया’ आदी संघटनांनी सभा आयोजित केली होती. यात सहभागी लोक हिंदुविरोधी घोषणा देत होते. ‘बकरी आणि डुक्कर यांचा बळी देण्याची मागणी करणारी मारी (अम्मन देवी) भगवान आहे का ? महिलांवर बलात्कार करणारा कन्नन् (भगवान कृष्ण) भगवान आहे का ? जर पुरुष दुसर्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवेल, तर त्यांना मूल होईल का ? अय्यपा यांना भगवान म्हणणे योग्य आहे का ?’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी ‘हिंदु मक्कल कत्छी’कडून (हिंदु जनता पक्षाकडून) तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. (हिंदूंच्या देवतांच्या विरोधात कुणी विधाने करत असेल, तर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवला पाहिजे ! – संपादक)
अण्णाद्रमुक आणि भाजपकडून विरोध !
१. याविषयी ‘अण्णाद्रमुक’ पक्षाचे प्रवक्ते कोवई सत्यन् यांनी ‘द्रविड कझगम’ पक्षावर टीका केली. ते म्हणाले की, हिंदूंना शिवी देणे, ही ‘द्रविड कझगम’ची संस्कृती आहे. या पक्षाचे म्हणणे आहे की, त्यांचा पक्ष कोणत्याही धर्माच्या अथवा हिंदूंच्या विरोधात नाही, तर मग ते अशा घोषणा देणार्यांवर कारवाई का करत नाहीत ? ते हिंदूंच्या अवमानावर मूकदर्शक का बनतात ?
२. भाजपचे प्रवक्ते नारायणन् तिरुपति यांनी म्हटले की, यापूर्वीही अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या असून सरकार नेहमीच मूकदर्शक बनली आहे. ‘द्रविड कझगम’ पक्ष असेच करत रहाणार असेल, तर त्याच्यावर बंदी घातली पाहिजे.
संपादकीय भूमिका
|