अरब देशामध्ये कचराकुंडीवर पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – अरब देशातील एक छायाचित्र सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले असून त्यावर बुटाचे ठसे उमटवले असल्याचे दिसूद येत आहे. काँग्रेसने यासंदर्भात ट्वीट करून टीका केली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की,  आम्ही मोदी आणि भाजप यांना देशातील लोकशाही मार्गाने पराभूत करूच; पण आमचा मोदीविरोध या देशात आहे. कचराकुंडीवर आमच्या पंतप्रधानांचे छायाचित्र लावणे, हे आम्हाला स्वीकार्य नाही. प्रत्येक भारतियाने या कृतीचा निषेध केला पाहिजे.

संपादकीय भूमिका

इस्लामी देश किंवा मुसलमान कितीही सधन झाले, तरी त्यांची मानसिकता विकृतच रहाते, हेच यातून लक्षात येते !