मराठा तितुका मेळावावा प्रतिष्ठानच्या वतीने १० वीतील विद्यार्थ्यांना साहाय्य !
शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर), ५ जून (वार्ता.) – मराठा तितुका मेळावावा प्रतिष्ठानच्या वतीने १० वीतील ५ गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाहूवाडी येथील आस्था या संस्थेत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. अनिरुद्ध घाटगे आणि पत्नी सौ. संजना यांनी हे साहित्य दिले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रणजित घरपणकर, उपाध्यक्ष श्री. विनायक करंबे, सचिव श्री. अनिल चिले यांसह अन्य उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य श्री. बाजीराव वारंग यांनी केले.