अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून सलीम याला जामीन संमत करतांना एक मास गोसेवा करण्याची आणि गोशाळेला १ लाख रुपये दान देण्याची अट !
सलीम याने गोहत्या केल्याचे प्रकरण
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील गोहत्या प्रकरणातील आरोपी सलीम याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन संमत करतांना एक मास गोसेवा करण्याची आणि गोशाळेला १ लाख रुपये दान देण्याची अट घातली आहे.
गोहत्येच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर आरोपी सलीम याने यापूर्वी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. तथापि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या एक सदस्यीय पिठाने सलीमला अनेक अटींवर जामीन संमत केला आहे. सलीम याने जामिनावर सुटल्यानंतर अटींचे पालन केले नाही, तर त्याचा जामीन रहित केला जाईल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
Deposit ₹1 lakh in Gaushala and serve cows for one month: Allahabad High Court imposes bail condition
report by @whattalawyer https://t.co/GG0RCC4od3
— Bar & Bench (@barandbench) June 4, 2022
सलीम याला गोहत्या प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत ३ ऑगस्ट २०२१ या दिवशी बरेलीच्या भोजीपुरा भागातून अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध गोहत्या कायदा १९५५ च्या कलम ३/८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.